*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुढत्व जीवाचे …*
~~~~~~~~~~~
हे जीवा सांग नां रे ,
ते तुझे अगम्य ठावठिकाण..
तू नको सांगू रे ,
तुझे देहधारिले नावगांव..।।धृ।।
कैसा येसी ? कोठूनी येसी ?
अन कोठे जासी ?..।
आजवरी कुणा न कळले ,
गूढ असे तुझे ठावठिकाण..।।१।।
परमात्मा तूंच नां रे ?
या नश्वर देहकुडीचा..।
तुझ्याविना कां रे ?
स्पंदनी गुणगुणते हरीनाम..।।२।।
तुझ्याविना चैतन्य कोणते ?
सारेच रे निष्प्राण..।
अंती कां ? त्यागिसी देहकुडी ,
कसा शोधू रे मी आत्माराम..।।३।।
असा कसा रे , निर्दयी तूं ,
लळा लावूनी जासी दूर..।
सांग रे कसले गुढत्व जिव्हारी
श्रीराम जयराम जयश्रीराम…
श्रीराम जयराम जयश्रीराम..।।४।।
~~~~~~~~~~~~~~~~
*©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*
