You are currently viewing वृद्धाश्रम
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

वृद्धाश्रम

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे सदस्य कवी, लेखक श्रीनिवास गडकरी यांची काव्यरचना.*

*खरं तर म्हातारपणी आई वडिलांची उपेक्षा करणारी व त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणारी नालायक मुले हा कथा, कविता, कादंबरी, सिनेमा, नाटके यातील एक लोकांप्रिय विषय आहे. पण तेव्हढ्याने हा विषय संपतो काय? यातील काही ठिकाणी तरी तुम्ही मुलांशी कसे वागलात काय चुका केल्यात त्याचा हा परिणाम नसतो काय?*

*वृद्धाश्रम*
————-

वृद्धाश्रमाची जिर्ण दारे पुन्हा पुन्हा वाऱ्याने खडखड करतात
खिडकीकडे लागलेले विझते डोळे आशेने फडफड करतात

हे तर होणारच होते, जे पेरले तेच नेमके उगवून वर आले
तारुण्यातल्या चुका आठवून यांची मने धडधड करतात

मुलामुलांत भेद केला, फळे त्याची आता मिळत आहेत
ज्यांच्या वाटेला हि उपेक्षा आली, ते आता तडफड करतात

आळशी, बदफैली, व्यसनी पालक कुणालाच नको असतात
बालपणात भोगलेल्या यातना आता उघड कडकड करतात

“सून परकी मुलगी आपली ” खाक्या आता अंगाशी येतोय
म्हातारपणी खस्ता खायला मुलगासून कटकट करतात

निवृत्तीनन्तर मिळालं डबोलं,त्याचा मुलांपुढे तोरा मिरवला
आता हातपाय थकल्यानन्तर प्रेमासाठी वणवण करतात

परावलंबी म्हातारपणाचे भविष्य वेळीच लक्षात आलं नाही
भावना आटलेले मुलगा सून यांच्या मागे थडथड करतात

कुठल्याच गोष्टीला केव्हाच कधी एकच बाजू असत नाही
स्नेहाचा ओलावा तयार करायला वेळीच मग धडपड करा.

श्रीनिवास गडकरी
रोहा पेण
09130861304

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =