You are currently viewing गुरु कोण

गुरु कोण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री सौ.मानसी मोहन जोशी लिखित अप्रतिम लेख*

*गुरु कोण*

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु या विषयावर थोडस विचार प्रकट करताना सगळ्यात प्रथम नजरेसमोर येतात ते आपले गुरु व्यास….ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात माऊली म्हणतात”व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकाराते वाट पुसतो”
व्यासांनी चारी वेद सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासले.त्यांनीच शब्दांकित केलेत चार कृष्ण… नारायण, वज्रप्रिया,व्यास आणि स्वतः कृष्णमय अर्जुन……गुरुमधे,त्यांच्या विचारामधे विरघळून कस जायच याच उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन.
व्यास ..सत्यवतीचा लग्नाआधीचा मुलगा….एका निर्जन बेटावर वाढलेला,पराशर ऋषींनी त्यांच शिक्षण केल.पण वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात अनेक विषयांचा अभ्यास केलाच होता.म्हणून म्हणतात……. “व्यासेचःशिष्ठम जगत उष्ठम” सगळे विषय त्यांनी उष्टे केलेत म्हणजे त्यांच्या बोलण्यात सगळे विषय येऊन गेलेत…सगळ्या विषयांवर ते बोललेत.अगदी युध्द,शस्त्रास्त्रे, युध्दाचे प्रसंग सुध्दा त्यांच्या बोलण्यातून आलेत म्हणजे सगळे विषय त्यांनी उष्टे केलेत अस म्हणतात पण केवळ ब्रह्म,परब्रम्ह या विषयी त्यांनी मौन पाळल आणि म्हणून परब्रह्म ते उष्टे करु शकले नाहीत असे रामकृष्ण परमहंस म्हणतात. ध्यानयोगाच्या गीतेतील सहाव्या अध्यायात असही म्हटलय की गुरु समाधी अवस्थेत असलेतरी तेथे चैतन्यरुप असतात,चैतन्य तिथे असतच.
म्हणून व्यास हे चैतन्यरुपात आपल्याबरोबर असतातच….त्यांची प्रथम गुरु म्हणून आषाढ पौर्णिमेला पुजा होते आणि तो दिवस गुरु पौर्णिमा मानला जातो… साजरा केला जातो.
अर्थात व्यावहारिक, संसारी जीवनात आपल्याला अनेक गुरु पावलोपावली भेटतात निसर्गातून,अनुभवातून,  परिसरातून आणि आपले शालेय शिक्षणाचे गुरु…
विनोबाजींच्या आईने सांगितले की ज्ञानेश्वरी मला समजेल अशा सोप्या भाषेत लिहि रे विनू…… तेव्हा विनोबाजींनी गीताई ,गीताप्रवचन ग्रंथ लिहिला…त्यांच ममत्व, आपलेपणा,आपुलकी गीताईमध्ये दिसून येते.आई हा आपला गुरू आहे पण आईला समजेल अशी भाषा आहे की नाही यासाठी विनोबाजी एका सहा वर्षाच्या मुलीला वाचून दाखवायचे, समजल का विचारायचे..नसेल समजल तर अजून सोप लिहायचा प्रयत्न करायचे तेव्हा ती छोटीशी मुलगीही त्यांची गुरुच ना?
“गीताई माझी माऊली
मी तिचा बाळ नेणता
पडता,रडता घेई
उचलोनी कडेवरी”
हाच अनुष्टूपछंद…कारण त्यांच्या विचारांच,भावनांच,संस्कार,संस्कृतीच,मनाच,कल्पनेचं पोषण गीताईन केल.मात्र मुकुटमणी असेल ती ज्ञानेश्वरीच.
एकदा एक आजोबा चारपाच खड्डे करुन ठेवले होते तिथ आक्रोडची रोप लावत होते…वेशांतर करुन जाण-या राजाने ते पाहिले आणि विचारले आजोबा या झाडांना आक्रोड यायला शंभरदिडशे वर्ष लागतील,कशाला लावता ही झाडं? आजोबा म्हणाले तो राजा आहे हे न ओळखल्याने
आजोबा म्हणाले मुर्खा मी फळ खातो ती माझ्या आजोबांनी लावलेल्या झाडाची…मग नातवंडांना फळ नकोत का मिळायला? म्हणून झाडं लावतो…पहा अजाणतेपणी ते गुरु झाले न राजाचे?
एकदा काही मित्र कारने जात होते कारचा वेग शंभरावर होता एका गावातून कार जाताना सवयीप्रमाणे काही कुत्री भुंकत मागे लागली…त्यातल एक हायवेपर्यत आल…एकजणाच बोट कारच्या खिडकीच्या बाहेर होत त्या कुत्र्याने झेप घेऊन बोटाचा चावा घेतला… सगळे घाबरले, त्याला हाँस्पिटलमधे लगेच जाऊया म्हणाले तेंव्हा तो मित्र हसला आणि म्हणाला…अरे त्या कुत्र्याचा नेम पहा,धेय्य बघा त्यान कशाप्रकारे उडी घेऊन बरोबर बोटाचा चावा घेतला..स्वतःच्या वेगाच,गाडीच्या वेगाच,झेपघण्याच टायमिंग याच अचूक कँलक्युलेशन्स बघा उगाच नाही दत्त महाराज त्याला आपल्या जवळ स्थान देत…त्यांनी चोवीस गुरू केलेत त्यापैकी हा एक….थोड जरी टायमिंग चुकल असत  बिचा-याच तर? बघा विचारातून,मनातून त्याने कुत्र्याला गुरु करून टाकले.
गुरु मार्गदर्शन, प्रेरणा,दिशा देतात आपल्याला..श्रीकृष्णाने गीतेत सामान्य उदाहरणानी मानवी जीवनाला दिशा मिळावी असे गुरुज्ञान दिले आहे. विचार,अडिड्युड बदला,जीवन सुकर आहे…..
एकदा बुध्ददेव ज्ञानप्रकाश वाटण्यासाठी एका गावात गेले तिथे एक माणून त्यांना खूप शिव्या देऊ लागला…त्यांचा आनंद नावाच शिष्य त्या माणसाला मारायला धावणार एवढ्यात बुध्दांनी त्याल थांबले आणि सांगितले अरे यातून माझ,तुझ अन त्याचही शिक्षण होतय…..वाट बघ थोडी.
दुसरे दिवशी बुध्द दुसऱ्या गावात निघाले तर हा माणूस वेशीपर्यत शिव्या देत त्यांच्या बरोबर आला.वेशीवर एका गोड मुलीने बुध्दांना सुंदर कमळ देऊन नमस्कार केला…बुध्दांनी ते फुल शिव्या देणा-या माणसाला दिले तेव्हा त्याने ते फेकून दिले…तेव्हा बुध्द म्हणाले मी दिलेल फुल तू घेतल नाहीस तर ते कुणाकडे राहिल माझ्याकडे न? तस मी तुझ्या शिव्या घेतल्याच नाहीत त्या तुझ्याकडेच गेल्या…हे ऐकून त्या माणसान त्यांचे पाय धरले…गुरु असे छोट्या दृष्टांतातूनही बरच मोलाच शिकवून जातात.
अंधाराला उत्तर अधिक अंधार नाही तर प्रकाश आहे….हे शिकवणा-या आयुष्यात क्षणोक्षणी भेटणाऱ्या सर्व गुरुंना विनम्र अभिवादन.

®©सौ.मानसी मोहन जोशी.
ठाणे प.

 

*संवाद मीडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा