You are currently viewing तिळगुळ घ्या गोड बोला
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

तिळगुळ घ्या गोड बोला

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित अप्रतिम लेख*

**तिळगुळ घ्या गोड बोला**

आपल्या बरेच काही सांगून जातो हा मार्मिक शब्द आज लोकांच्या स्वभावात मोठा बदल झाला आहे. लोक तोंडावर गोड बोलतात आणि मागे आपल्याला वाईट म्हणतात. ही जगाची रीत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्याला एक सण असे बारा महिने बारा सण असतांत त्या नुसार त्यांचे महत्व वेगळ असतं. शिकवणं कपडे घालणे. खाणंपिणं. वनस्पती वापर. फळे फुले भाजीपाला यांचा वापर त्या त्या वातावरणानुसार कसा करावा त्याचा फायदा तोटा यांची महती सांगण्यासाठी सणांचे माध्यम हे सर्वात महत्वाचे माध्यम आहे.


उन्हाळा. पाऊसाळा ‌ हिवाळा. त्यानुसार होणारें नैसर्गिक बदल यासाठी आपले शरीर सुदृढ आणि रोगप्रतिकारक करण्यासाठी आपण काय आणि केंव्हा खाल्ले पाहिजे . याचसाठी सुध्दा सण हा सर्वात महत्वाचा आपला गुरु आहे.
आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचं आपण पाहातो. या पंरंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पुर्वजांचा एक चांगला हेतु असल्याचे लक्षात येते. गुढीपाडवा, दिपावली, दसरा, गणेशचतुर्थी, नवरात्र, यांसारखाच आणखीन एक महत्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकरसंक्रांत!!! मकरसंक्रात सणापुर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सुर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते. आणि हा सुर्यदेव तापायलाच तयार नसतो! तो तयार होतो ते या मकरसंक्राती पासुन!मकरसंक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे हा सण कायम १४ जानेवारीलाच येतो (कधीतरी या सणाला १३जानेवारी किंवा १५ जानेवारीला आल्याचे आपण पाहातो पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी १४ जानेवारीला येतो) पौष महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे.


मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. आपल्या गावातील बाजार गाजर ‌ पावटा. तिळ. गुळ. लसुण. पातीचा कांदा ‌ बोर यांनी बाजार फुलला असेल भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.आपलया मैत्रीण. बहिण सवाशिनी महिला यांना हळद कुंकू. आणि संक्रांत भेट म्हणून वस्तू वाटप करतात म्हंजे दान धर्म या़ची जाण करून देणारा सण म्हणजे मकर संक्रांत होय. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.


वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरबऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, लालचुटुक गाजरे, भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळभाजीला भोगीची भाजी म्हणतात.
दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे.
मकर संक्रांती
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि।।
(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य . ओला लसूण कांदा. गाजर. बाजरी भाकरी. इत्यादी वस्तू वाहतात.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात.. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो. म्हणजे प्रत्येक सणांमध्ये आपल्या खाण्यात येणार्या खाद्यपदार्थ यामध्ये काहीतरी मर्म दडलं आहे. जस दिवाळी ही थंडीमध्ये येते तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या अंगात गर्मी तयार होतें. आषाढ महिना हा पाऊसाचा महिना असतो त्यावेळी सर्वत्र पाऊस वातावरण गार गार असतं यावेळी आपल्याला उष्णतेची गरज असते म्हणून या महिन्यात मांस मटन मासे मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात. तसंच मकर संक्रांत यावेळी थंडी जास्त असते त्यावेळी आपण तिळ. गुळ. बाजरी भाकरी. वरीचा भात. अश्या गरमाई पैदा करणारे खाद्यपदार्थ खातो म्हंजे प्रत्येक सणात आणि खाणपान यामध्ये काहीतरी तथ्य आहे.
मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. तामिळनाडूमध्ये उत्तरायण, गुजरात आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा, ओडिशामध्ये मकर संक्रांती, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल (ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात), उत्तर प्रदेश (खिचडी संक्रांती देखील म्हणतात), उत्तराखंड (ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात) किंवा सोप्या भाषेत, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती, माघे संक्रांती (नेपाळ), सोंगक्रान (थायलंड), थिंगयान (म्यानमार), मोहन सोंगक्रान (कंबोडिया), आणि शिशूर सेनक्राथ (काश्मीर).
मकर संक्रांती सामाजिक सण जसे की रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, बोनफायर आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते मघा मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे. अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात. दर बारा वर्षांनी, हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात – जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक, अंदाजे 60 ते 100 दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमात, ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात, ही परंपरा आदि शंकराचार्यांना दिली जाते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्याचा पुत्र शनि आपल्या मकर राशीत गुरु महाराज बृहस्पतीत आणि ग्रहांचे राजकुमार बुध चंद्राच्या सहाय्याने सूर्यदेवाचे मकर राशीत स्वागत करतील. अशा ग्रहांचा संयोग फारच दुर्मिळ मानला जातो कारण ग्रहांच्या या संयोगात, ग्रहांचा राजा, गुरु, राजकुमार, न्यायाधीश आणि नक्षत्रपती एकत्र असतील. श्रवण नक्षत्रात सूर्याचा प्रवेश होईल, ज्यामुळे ध्वज नावाचा एक शुभ योग निर्माण होईल. ग्रहांचे राजा सूर्यसिंहावर आरूढ होऊन मकर राशीत प्रवास करतील. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाचा प्रभाव वाढेल आणि देशातील राजकारणात आणि राजकीय क्षेत्रात उलथापालथात होईल. काही ठिकाणी सत्तेत फेरबदलही होऊ शकतात. मकर संक्रांतीला सुर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे बर्याच ठिकाणी भाग्य उदय होण्याचे योग जुळून येतात मग यामुळेच याचं काळात ठराविक ठिकाणी निवडणूक आयोजित केली जाते कां.
कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.महाभारत यामध्ये इच्छा मृत्यू असणारे पितामह भिषम हे अर्जुना कडून करण्यात आलेल्या बाणाच्या शय्येवर उत्तरायण वाट पाहत होते कारणं इच्छा मृत्यू याचे वरदान उत्तरायण मध्ये पूर्ण होते असं पुराणांमध्ये उल्लेख आहे.
संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही हे सर्व आपल्या मनातील नकारार्थी विचार असतांत सणवार हे त्यांच्या वेळेनुसार येत असतात त्यांना कोणतेही वाहनं किंवा त्यापासून आपला कोणताही घातपात होत नाही. याला कोणतेच तथ्य नाही
ऋतुचा बदलतं असतांत घटकेत ऊन घटकेत थंडी. म्हणजे दमट गार गरम असं वातावरण तयार होते आणि या वातावराणाचा माणवी. परिणाम लहान मुलांवर होऊ नये यासाठी या कालावधीत मिळणारी फळे (बोर, उसाचे तुकडे) भूईमुगाच्या शेंगा मुलांच्या डोक्यावर टाकल्या जातात. मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. काळया रंग हा सुर्य प्रकाश आरपार पाठवितो त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होते त्यामुळे काळे कपडे घालण्याची प्रथा आहे. तसंच या कार्यक्रमासाठी लहान मुलांना आणि जवळच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना. सगेसोयरे बोलावलं जातं.तयांना तिळगुळ गोड वाटप केले जाते.
एकामेकाबधदल असणारा मनातील कडु पणा विसरा आणि तिळगुळ घया गोड बोला. सध्या आपली परस्थिती तशी नाही. परवा कोरोना महामारी संकटाने आपल्याला अजून सोडलं नाही. आपण अजून कर्जात आहोत. राजकीय निवडणूक तणाव आहे त्यामध्ये आपशी मतभेद यामुळे आजही आपल्या मनांत एकामेका विषयी वैरभाव आहे.विविध विभागातील भरती घोटाळा आहे. रेशन घोटाळा आहे. महागाई. बेरोजगारी. आर्थिक संकट. सामाजिक संकटं. वैद्यकीय संकट. शैक्षणिक संकट. यामुळे आजही लोक गोड खाण्याच्या किंवा गोड बोलण्याच्या परस्थिती नाहीत. आजही अपहरण. खून. मारामाऱ्या. गुंडगिरी. गुन्हेगारी. टोळीयुद्ध ‌ छेडछाड. बलात्कार. अशा प्रकरणानी आजही आपल्या आईबहिण शाळेत शिकणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =