You are currently viewing श्री.एम. के. गोंधळी….माजी शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर….बहुआयामी व्यक्तिमत्त्व

श्री.एम. के. गोंधळी….माजी शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर….बहुआयामी व्यक्तिमत्त्व

 

कोल्हापूर विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक, एम. के. गोंधळी बहुआयामी व्यक्तिमत्त्व….! शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या एम.के.गोंधळी सरांनी ड्रामा डिप्लोमा केला असून सूत्रसंचालन, निवेदक, एकपात्रीकार, कथाकथनकार, नाट्य अभिनेता, उत्तम वक्ता, कवी, वात्रटीकार, आकाशवाणी व दूरदर्शन कलाकार, अशा एक ना अनेक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. इंग्लंड मधील अनेक शहरांमध्ये “पपेट अँड कॉमेडी” शो करून देश विदेशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

महिमा गुरूंचा, वाचिक अभिनय तंत्र आणि मंत्र या त्यांच्या सीडी/डीव्हीडी प्रकाशित झाल्या आहेत. “खुदुखुदू, खदाखदा” हा त्यांचा प्रसिद्ध एकपात्री प्रयोग असून “माणूस आडवा गेला” या नावाने पहिला विनोदी काव्यसंग्रह त्यांनी वाचकांच्या भेटीस यापूर्वीच आणलेला आहे. प्रा.एम. के. गोंधळी सरांचा प्रकाशित झालेला दुसरा काव्यसंग्रह म्हणजे *”म्हणे एमकेजी”*. जिथं म्हणे असतं तिथं काही सांगायचं असतं. या अर्थानं हा काही सांगणारा काव्यसंग्रह आहे. *”आई तुजविन ….या जगात काही नाही”* असं म्हणणारा माणूस हा हृदयाचा कवी असतो. एमकेजी हा त्या अर्थी हृदयाची स्पंदने टिपणारा कवी आहे, अशा शुभेच्छा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांनी दिल्या आहेत. अशी स्पंदने टिपणारी माणसे अनेकांच्या हृदयात जागा मिळवतात, कित्येकांच्या हृदयावर राज्य करतात.

*”आई तुझं जातं मनातून जाता जात नाही”* अशा आईच्या आठवणींचा ओलावा कवी एमकेजी यांच्या “म्हणे एमकेजी” या काव्यसंग्रहातून आपल्या हृदयाला स्पर्शून जाणार आहे. “माणूस आडवा गेला” या विनोदी काव्यसंग्रहास आपला भरभरून प्रतिसाद लाभला तसाच हृदयाला भिडणाऱ्या कवितांचा खजाना असलेल्या “म्हणे एमकेजी” या दुसऱ्या काव्यसंग्रहालाही लाभेल यात तिळमात्र शंका नाही. आपल्या हरहुन्नरी बहुआयामी व्यक्तिमत्वातून नेहमीच मनोरंजन करणाऱ्या माजी शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर प्रा.श्री.एम.के.गोंधळी यांचा आज वाढदिवस…. संवाद मिडियाकडून त्यांना उदंड आणि उत्तम आयुष्याच्या अखंड शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 1 =