You are currently viewing माडखोल येथे दूध व पशुसंवर्धन ट्रेनिंग सेंटर सुरु…

माडखोल येथे दूध व पशुसंवर्धन ट्रेनिंग सेंटर सुरु…

माडखोल येथे दूध व पशुसंवर्धन ट्रेनिंग सेंटर सुरु

जिल्हा बँक व भगीरथ चा उपक्रम

सावंतवाडी:

सिंधुदुर्गात दूध, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन व्यवसाय वाढीतून रोजगार निर्मितीद्वारे सुजलाम सुफलाम गावे करण्याचा जिल्हा बँकेचा उद्देश आहे. त्यासाठी जिल्हय़ात सहय़ाद्री पट्टय़ातील माडखोल येथे दूध प्रक्रिया, पशुसंवर्धनचे ट्रेनिग सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ट्रेनिग सेंटरमध्ये तरुणाना दूध व पशुसंवर्धनचे ट्रेनिग देऊन त्यांना या उद्योग व्यवसायात उभे केले जाणार आहे. येत्या सहा महिन्यात माडखोल देशक्रोशीतील ५०० दूध उत्पादन देणारे जनावरे पहायला मिळतील, असे जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यानी आज माडखोल येथे बोलताना स्पष्ट केले.
माडखोल भगवती हॉल येथे जिल्हा बँक व झाराप येथील भगिरथ प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने दूध उत्पादक शेतकरी सोसायटीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, दूध व्यावसायिक उद्योजक प्रभाकर देसाई, जि. प. सदस्य मायकल डीसोजा, प्राजक्ता केळुसकर, पंचायत समिती सदस्य रविंद्र मडगावकर, संचालक गुरुनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. सावंत म्हणाले, माडखोल भागात प्रभाकर देसाई यानी डेअरी फार्म सुरु केला आहे. या डेअरी फार्ममध्ये जिल्हा बँक व भगिरथ प्रतिष्ठान याच्यामार्फत दूध व उत्पादन व पशुसंवर्धनचे ट्रेनिग शेतक-याना दिले जाणार आहे. यासाठी हे जिल्हय़ातील पहिले ट्रेनिग सेंटर सुरु करीत आहोत. शेतक-याना गायी, म्हशींसाठी कर्ज हवे असल्यास अगोदर ज्याच्याकडे भगिरथचे ट्रेनिग केल्याचे प्रमाणपत्र असेल त्यांना कर्जपुरवठा केला जाणार आहे. केंद्र वर राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, त्यांचा लाभ घ्यावा”.
ते पुढे म्हणाले, कोकणात गावागावात फक्त ग्रामपंचायतकडे लक्ष दिले जाते. पश्चिम महाराष्ट्रात ग्रामपंचयातीकडे लक्ष कमी अन् दूध, विकास सोसायटीच्या विकासाकडे लक्ष अधिक हे चित्र आता आपल्याकडे सुरु व्हायला हवे. राजकत्यांनी गावातील दूध विकास सोसायटीच्या उन्नतीकडे लक्ष द्यायला हवा. तरच गावाचा, शेतकरयाचा विकास होईल. माडखोल दशक्रोशीतील कलंबिस्त, सांगेली, वेर्ले, शिरशिगे, कारिवडे, आबेगाव,केरी, कोलगाव भागात येत्या सहा महिन्यात ५०० जनावरे उपलब्ध होतील, गोकुळ नांदायला हवे.
डॉ. देवधर म्हणाले, दूध, कुकुटपालन, शेळीमेंढी पालनचे प्रशिक्षण घ्यायला हवे. त्याशिवाय प्रगती होणे नाही. तुम्ही ट्रेनिग घेतले तरच यामध्ये यशस्वी होऊ शकाल. माडखोल येथे प्रत्येकी पाच तरुणाच्या टीमला ट्रेनिग दिले जाईल. यावेळी दूध संस्था व विकास सोसायटीचे चेअरमन गजानन सावंत, रवींद्र मापसेकर, अॅड. संतोष सावंत, बाबुराव कविटकर, लिगोजी राऊळ, चंद्रकांत राणे, ज्ञानेश्वर सावंत, दत्ताराम कोळंबेकर, उमेश गावकर, जॅकी डिसोजा, सुरेश सावंत, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, पुरुषोत्तम राऊळ, अभय किनळोसकर, प्रमोद परब, महेश सावंत, सूर्यकांत राऊळ, सत्यवान कदम, केळुस्कर, बँक ऑफ इंडियाचे प्रभू उपस्थित होते. यावेळी गुरुनाथ पेडणेकर यानी विचार मांडले, सूत्रसंचालन विलास नाईक तर आभार गोठेश्वर यानी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − six =