You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा सामजिक न्याय विभागाची कुडाळ येथे बैठक संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा सामजिक न्याय विभागाची कुडाळ येथे बैठक संपन्न

जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी केले मार्गदर्शन

सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कुडाळ मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा पदाधिकारी यांची महत्वाची बैठक जिल्हाध्यक्ष दिपक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक जाधव यांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले.

प्रत्येक तालुकाध्यक्षांनी आपले स्वत:चे लेटरहेड बनवणे.

लवकरात लवकर आपल्या तालुक्यातील जि.प. व पं.स. तसेच बुथ स्तरावर एक एक सदस्य घेऊन मजबु कार्यकारणी तयार करणे.

लवकरात लवकर कार्यकारणी पुर्ण करुन आपल्या तालुका कार्यकारणीला मान्यता घेणे.

आपल्या स्तरावर काही मागण्यांची निवेदने तालुका स्तरावर करणे त्याची एक प्रत जिल्हा कार्यकारणीकडे_ जिल्हाध्यक्ष यांना देणं अनिवार्य आहे.

जिल्ह्याच्या बैठकांना उपस्थित राहणे. तसे न केल्यास त्यांच्या पदावर कारवाही होईल असा जिल्हा बैठकीत निर्णय घेण्यात आला.

विविध सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर चर्चा व मार्गदर्शन जिल्हा सरचिटणीस योगेश वराडकर यांनी केले.
यावेळी खालील ठराव करुन ते बेसिक कार्यकारणीला देण्याचे ठरले.

दोडामार्ग येथे जुन्या पोलिस स्टेशन च्या शासकीय जागेत भव्य स्वरुपाचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणे, सदरचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळ व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या शिफारशींने पाठवावा.

छत्रपती संभाजी महाराज यांचा ५० फुट अश्वारूढ पुतळा बांदा कट्टा सर्कल ला उभारावा याचा प्रस्तावदेखील ना.अजितदादा पवार यांना पाठवावा.

सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असुन देखील पक्ष वाढीसाठी आपल्या परिने प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांना तालुका जिल्हा शासकीय कमिट्यांवर सामाजिक न्याय विभागाचा प्रतिनिधित्व म्हणुन समाविष्ट करावे. जेणेकरून त्यांना पक्षवाढीस काम करताना बळ मिळेल. तशा प्रकारच्या सुचना बेसिक तालुकाध्यक्ष यांना जिल्हा पातळीवरुन देण्यात याव्यात.

यावेळी दीपक जाधव जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग योगेश वराडकर जिल्हा सरचिटणीस, नवराज कांबळे जिल्हा उपाध्यक्ष, गोविंद कदम दोडामार्ग तालुकाध्यक्ष, अरुण जाधव सावंतवाडी तालुकाध्यक्ष, सखाराम जाधव वेंगुर्ला तालुकाध्यक्ष, संदिप पिंगुळकर कुडाळ तालुकाध्यक्ष तर, आभार जिल्हा सरचिटणीस श्री योगेश वराडकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा