You are currently viewing सावडव येथील उबाठा गटाचे विद्यमान शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांचा भाजपात प्रवेश

सावडव येथील उबाठा गटाचे विद्यमान शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांचा भाजपात प्रवेश

*सावडव येथील उबाठा गटाचे विद्यमान शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांचा भाजपात प्रवेश*

*उ.भा.ठा गटाला सहाव्या दिवशी एकापाठोपाठ एक धक्के सुरूच*

*आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश*

कणकवली

सावडाव येथील उबाठा गटाचे विद्यमान शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांनी आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्या कडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सावडाव गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन अशोक वारंग यांनी हा प्रवेश केला.

उपस्थित संदीप सावंत, दत्ता काटे उपसरपंच सावडाव, संजय झगडे, अनंत जाधव, भाई आंबेरकर, आदि भाजप उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा