You are currently viewing तालुक्यातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्या

तालुक्यातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्या

वैभववाडी युवक काँग्रेसची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

वैभववाडी

तालुक्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्या. या मागणीचे निवेदन राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना वैभववाडी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे. मंत्री श्री चव्हाण यांची पदाधिका-यांनी मुंबई येथे भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार व खासदार नाहीत. त्यामुळे तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात कोकिसरे व सोनाळी गावातील विकास कामांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव, काँग्रेस पदाधिकारी आनंद पवार, प्रमोद कदम, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा