You are currently viewing ७ दिवस चालणार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा

७ दिवस चालणार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा

कणकवली :

मुंबई ते सिंधुदुर्ग अशी सात दिवस चालणारी सर्वात मोठी जन आशीर्वाद यात्रा केंद्रीय लघु, सूक्षम व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची निघणार आहे.ही यात्रा १९ ऑगस्ट ला मुंबई पासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या संकल्पनेतून आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मार्गदर्शनाखाली या जन आशीर्वाद यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई व्हाया वसई विरार करून रायगड, रत्नागिरी, अशी सिंधुदुर्ग जिल्हात २५ ऑगस्ट रोजी येईल ही यात्रा ११ जिल्ह्यातून , ९ लोकसभा मतदारसंघात, ३३ विधानसभा संघातून जाणार आहे.३०० पेक्षा जास्त सभा होणार आहेत.पूरग्रस्थानसाठी दिलासा देणारी नुकसानग्रस्थानचे अश्रू पुसणारी ही जन आशीर्वाद यात्रा असेल अशी माहिती या यात्रेचे संयोजक भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकी नंतर पत्रकार परिषद घेऊन श्री.जठार यांनी माहिती दिली.यावेळी भाजपा आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे,जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर,जिल्हा सचिव प्रभाकर सावंत,उपाध्यक्ष राजू राऊळ, आदी उपस्थित होते.

श्री प्रमोद जठार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्थारात ३४ नवे मंत्री झाले त्यांचा दौरा त्याच्या भागात आयोजित केला आहे.गेल्या ७ वर्षात मोदी सरकारने जी विकास कामे केली. ३५० वर्षात सुटले नाहीत ते देशा प्रश्न सोडविले ते जनतेपर्यत घेऊन जात अजून जे प्रश्न आहेत ते जाणून घेण्यासाठी ही यात्रा आहे.जनता हीच सर्वश्रेष्ठ आहे,आणि मी प्रधान मंत्री नसून प्रधान सेवक आहे. ही भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे.त्यामुळे ते येती २५ वर्षे देशाचे मोदीच पंतप्रधान असतील हे जनतेचे आशीर्वाद आहेत.असा विश्वास यावेळी प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. राज्यात अशा ४ ठिकाणी जन आशीर्वाद यात्रा होणार आहे असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल होतील. २० ऑगस्ट रोजी मुंबई उपनगरात ही जन आशीर्वाद यात्रा दाखल होईल. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी वसई-विरार येथे ही जन आशीर्वाद यात्रा दाखल होणार आहे. २२ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन असल्याने त्या दिवशी यात्रेला विश्रांती देण्यात येईल. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री गणेश दर्शन करून महाड चवदार तळे येथे डॉ.बाबा साहेबांना अभिवादन करून चिपळूण पुरग्रस्थ भागातील प्रश्न जाणून घेऊन यात्रा पुढे रवाना होईल. २४व २५ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत जन आशीर्वाद यात्रा फिरेल.छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले जाईल.जनतेच्या भेटी गाठी घेतल्या जातील आणि २५ आॕगस्ट रोजी जन आशीर्वाद यात्रा दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचा दौऱ्यावर करून मंत्री नारायण राणे मान्यवरांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत.खारेपाटण मध्ये २५ रोजी दुपारी ४ वा आगमन होईल. ,तरळे, नाधवडे, वैभववाडी मार्गे फोंडा कणकवली असा प्रवास ही जन आशीर्वाद यात्रा करेल.यावेळी कणकवली शहरात भव्य रोषणाई करून स्वागत केले जाणार आहे.

राणे साहेब विकासाचा बॅकलॉग भरून काढतील
विकासापासून दूर गेलेल्या कोकणात पुन्हा विकास गंगा आली पाहिजे.आपली जनता सुखी झाली पाहिजे, आर्थिक सक्षम झाली पाहिजे ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भावना आहे.भाजप चा कार्यकर्ता सुद्धा आत्मनिर्भर झाला पाहिजे.हे त्यांचे स्वप्न आहे. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली  मोदी, शहा, नड्डा, याच्या आशीर्वादाने ही जन आशीर्वाद यात्रा निघत आहे. यात कोव्हीड चे सर्व नियम पाळले जाणार आहेत. सावंतवाडी यात्रेचा समारोप होईल असे श्री.जठार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा