You are currently viewing साळगाव येथील रस्ताच्या कामाचा संजय पडतेंच्या हस्ते शुभारंभ

साळगाव येथील रस्ताच्या कामाचा संजय पडतेंच्या हस्ते शुभारंभ

कुडाळ

तालुक्यातील साळगाव निवलीचे टेंब येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून हा रस्ता मंजूर झाला आहे. त्यांनी या रस्त्यासाठी ५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी तालुका संघटक बबन बोभाटे विभाग प्रमुख गुरू सडवेलकर, उपविभाग प्रमुख हंसराज सावंत, शाखाप्रमुख हेमंत सावंत, संदीप सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी सावंत, सदस्या सौ. तृप्ती सावंत, सौ. तेजस्विनी सावंत, सिद्धी मेस्त्री, प्रताप धुरी, बंड्या कोरगावकर, प्रमोद सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा