You are currently viewing न्हावेली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी आनंद नाईक यांची निवड

न्हावेली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी आनंद नाईक यांची निवड

सावंतवाडी :

 

न्हावेली देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष आनंद चंद्रकात नाईक यांची न्हावेली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आनंद नाईक हे यापूर्वीही तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होते. तत्कालीन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी श्री नाईक यांच्या सामाजिक कार्यांचे कौतुक केले होते.

न्हावेली गावाला तंटामुक्त पुरस्कारही मिळाला होता.गावातील सामाजिक कार्यात नाईक यांचे मोठे योगदान आहे.वेळप्रसंगी मदतीला धावून जाणारे व्यक्तिमहत्व अशी त्यांची गावात ओळख आहे ग्रामस्थांच्या आग्रहाखातर अवघ्या गावाने ग्रामसभेत आनंद नाईक यांची तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली.यापूर्वी आपण तंटामुक्त समितीचा अध्यक्ष असताना गावातील वाद मिटविण्यात यश मिळविले होते.ग्रामस्थांच्या आग्रहामुळे आपण पुन्हा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली अशी प्रतिक्रिया बोलताना आनंद नाईक यांनी केली.

यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊसकर,उपसरपंच संतोष नाईक,सदस्य आरती माळकर,सागर धाऊसकर,स्नेहा पार्सेकर,तलाठी वर्षा नाडकर्णी माजी सरपंच शरद धाऊसकर,माजी उपसरपंच विठोबा गावडे,सचिन पार्सेकर, हेमचंद्र सावळ,विलास मेस्री,अंकुश मुळीक, प्रशांत कांबळी,सुनिल धाऊसकर,गितेश परब,लक्ष्मण धाऊसकर,भावना धाऊसकर, गंगेश्वर कोचरेकर सानिया हरमलकर,रुपाली परब,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 14 =