You are currently viewing बहाणे प्रेमाचे

बहाणे प्रेमाचे

सांग कशाला होऊ मी तुझ्या लेखणीचे प्रेम,
जडणार नाही तुझ्यावर सहजासहजी हे प्रेम.

मनात येते तसेच लिहीत जातोस काव्यात,
तुला वाटतं तसं काहीच नसतं माझ्या मनात,
उगाच नको धरुस तू माझ्यावर असा नेम,
जडणार नाही तुझ्यावर सहजासहजी हे प्रेम.

शब्द शब्द जपून लिही शब्दांना असते मोल,
उगाच नको फेकू शब्द अलगद जाईल तोल,
आवर तुझ्या मनाला असा होतंच नाही गेम,
जडणार नाही तुझ्यावर सहजासहजी हे प्रेम.

फेकून फासे शब्दांत अडकविणे हे बहाणे जुने,
किंमत नाही हिऱ्यांना तिथे काय कामाचे सोने,
माणसातली माणुसकी ही नसते सर्वांची सेम,
जडणार नाही तुझ्यावर सहजासहजी हे प्रेम.

कुठंवर लिहिशील काव्य संपेल शब्द भांडार,
शब्द न सुचतील आयुष्यात पडेल दाट अंधार,
सौंदर्याची खाणंच मी दहा गावात आहे फेम,
जडणार नाही तुझ्यावर सहजासहजी हे प्रेम.

(दिपी)✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा