You are currently viewing राष्ट्रीय कृषी दिन

राष्ट्रीय कृषी दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य गायक संगीतकार गीतकार श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 

*”राष्ट्रीय कृषी दिन”*

 

अन्नदाता कृषीवलाचा राखावा सन्मान

परंपरा थोर आहे देश कृषी प्रधान!!धृ!!

 

शेतकरी बीज पेरतो पिकवितो अन्न

पिकवितो मोती भाज्या काळ्या मातीतून

करितो हरितक्रांती ओथंबतो घामानं!!1!!

 

कसे जगायचे भाकरी राहे शिकवित

का जगायचे बोध मिळे फुलां पासून

कोड्याची उकल करते जीवन जगणं!!2 !!

 

वसंतात तरु वेली डोलती पक्षी गात

आम्रतरू मोहरे कोकीळ गात पंचमात

वैभव कृषीवल वाढवी पर्यावरण !!3!!

 

सृष्टीचे पूजन करी पशुधनांचे सन्मान

कृषीवल करिती धान्याची साठवण

रोजी निर्मिती मधुमक्षि कुकुट शेळीपालन!!4!!

 

आरोग्य रक्षा सुरक्षेचे भस्म प्रतिक

किटक नाशक रक्षक रक्षा कवच

धरा निर्जंतुक सुपीक भस्म करीत!!5!!

 

बेडूक डराव डराव ओरडती नाद

किटक पतंग चतुर काजवे शेती मित्र

रक्षक नाग गांडूळ करी सुपीक जमीन!!6!!

 

मनुष्याला भौतिक गरजा आहेत अटळ

कृषक पिकवे फळे फुले विविध अन्न

गाई गुरे सांभाळी मिळे गोमय गोधन!!7!!

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन 410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा