You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा धनगर समाजावतीने महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला सत्कार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा धनगर समाजावतीने महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला सत्कार

वैभववाडी

काल झालेल्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त वैभववाडी येथे कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री नारायण राणे यांचे आगमन झाले. नारायण राणे साहेब यांची यांची केंद्रीय मंत्री पदी निवड झाल्याबद्दल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा,शाल व पुष्पगुच्छ देऊन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष श्री नवलराज विजयसिंह काळे यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा खजिनदार संजय बोडेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य जयेश शेळके, वैभववाडी तालुका युवा अध्यक्ष अनिल कोकरे, वैभववाडी तालुका अधक्ष दाजी बर्गे,तालुका सल्लागार गंगाराम शिंदे,तालुका सरचिटणीस चंद्रकांत बोडेकर,तालुका युवा सरचिटणीस अक्षय शेळके,पदाधिकारी विलास फाले,रमेश शेळके लक्ष्मण शेळके,निलेश शेळके आधी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा