गुगल या जगप्रसिद्ध कंपनीच्या सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातून व पाथ संस्थेच्या वतीने कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट (PSA प्लांट ) बसविण्यात येणार आहे व २५० केव्ही जनरेटर पुरविण्यात येणार आहे. हा प्लांट बसविण्याच्या दृष्टीने पाथ संस्थेची टीम पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झाली होती. १ हजार लिटर एवढी या ऑक्सिजन प्लांटची क्षमता असणार आहे. त्याबाबतचे पत्र पाथ संस्थेच्या डॉ. जयश्री यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्याकडे सुपूर्द केले. याबद्दल आ.वैभव नाईक यांनी गुगल कंपनी,पाथ संस्था व जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आभार मानले. यावेळी कुडाळ वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर उपस्थित होते.
गुगल कंपनी व पाथ संस्थेच्या वतीने कुडाळ महिला बाल रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविणार
- Post published:जुलै 16, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
जिल्ह्यात आज 24 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
२५ वा सौरचक्र सुरू होणार आहे, त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घ्या.
सावंतवाडी बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची बदली राजकीय हेतूने प्रेरित..?
