You are currently viewing १२ वीच्या गुणवंत मुलांना आज टॅब वितरण

१२ वीच्या गुणवंत मुलांना आज टॅब वितरण

मालवण शहरातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने टॅब देऊन सत्कार करण्यात येणार आहे. माजी खा. राणे यांनी या मुलांना टॅब देण्याची घोषणा केली होती. त्याची वचनपूर्ती यानिमित्ताने होणार आहे. आज रविवारी १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी बारावी मध्ये प्रथम क्रमवारीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी मालवण शहरातील सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, लोकप्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन शहर प्रभारी विजय केनवडेकर, भाजयुमो शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 6 =