You are currently viewing केंद्रीय मंत्री ना. राणे यांचा दोडामार्गमध्ये उद्या सत्कार करणार

केंद्रीय मंत्री ना. राणे यांचा दोडामार्गमध्ये उद्या सत्कार करणार

जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत

दोडामार्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोडामार्ग मध्ये रविवारी २९ ऑगस्ट रोजी “जन आशीर्वाद यात्रा ” होणार आहे.केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात प्रथमच येणाऱ्या नारायण राणे यांचे स्वागत मोठ्या दिमाखात होणार आहे तर त्यांचा सत्कार सुध्दा करण्यात येणार आहे.नारायण राणे यांच्या…..केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोडामार्ग मध्ये रविवारी २९ ऑगस्ट रोजी “जन आशीर्वाद यात्रा ” होणार आहे.केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात प्रथमच येणाऱ्या नारायण राणे यांचे स्वागत मोठ्या दिमाखात होणार आहे तर त्यांचा सत्कार सुध्दा करण्यात येणार आहे. नारायण राणे यांच्या जल्लोषी स्वागतासाठी भाजपा कार्यकर्ते सज्ज झाले असून “जन आशीर्वाद यात्रेसाठी”काही तासच शिल्लक आहे असेच म्हणावं लागेल.दोडामार्ग शहराच्या चौकात मोठया दिमाखात स्वागत केले जाईल असल्याची माहिती शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा