You are currently viewing वानोशी कुडासे (दसई) बंधाऱ्यावर ताळगाव (पणजी) येथील मामा भाचीचा बुडून दुर्दैवी मृत्यु

वानोशी कुडासे (दसई) बंधाऱ्यावर ताळगाव (पणजी) येथील मामा भाचीचा बुडून दुर्दैवी मृत्यु

दोडामार्ग

ताळगाव (पणजी) येथील दोघांचा कुडासे दोडामार्ग (वानोशी दसई बंधारा)येथील नदीत बुडून मृत्यू झाला. दोघांनाही कासारवर्णे पेडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते पण त्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. पुढील तपास दोडामार्ग पोलीस करणार आहेत. ही माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

कुडासे दोडामार्ग येथे नदीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावे विजय पालयेकर (वय ५५) आणि तनिषा ठाकुर (वय १३) अशी आहेत. दोघे मामा भाची होते. तनिषा हरमलची असून ताळगाव येथे आपल्या मामांकडे आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा