You are currently viewing वाफोली येथील ५० पूरग्रस्तांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

वाफोली येथील ५० पूरग्रस्तांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

बांदा

बांदा:वाफोली गावातील ५० पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पस्तीस किलो अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. वाफोली सोसायटी सभागृहात पूरग्रस्तांना या वस्तूंचे वितरण करण्यात आले.

सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव, सतीश बागवे, शैलेश नाईक, आनंद रासम, मिलिंद वंजारी, अश्विनी पाटील, आसिफ यनी, गणेश राठोड, शरद सावंत, देविदास बोर्डेकर, शैलेश पई, महेश सारंग, विवेक बांदेकर, सुभाष पणदुरकर, नेत्ररोतज्ञ डॉ तळेगावकर, बिल्डर संजय सावंत, उदय अळवणी, सुनील नाईक, प्रसाद कोदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल बाबर आदींच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून वाफोली गावात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा