You are currently viewing माणगाव खोऱ्यातील नानेली येथे‌ पहिले कोवड सेंटर सुरू

माणगाव खोऱ्यातील नानेली येथे‌ पहिले कोवड सेंटर सुरू

माणगाव :

कुडाळ तालुक्यातील माणगाव- खोऱ्यामध्ये नानेली जिल्हा परिषद शाळा नं.१ येथे २५ बेडच कोविड सेंटर करण्यात आले शिक्षणाधिकारी श्री.एकनाथ आंबोकर यांच्याहस्ते कोविड सेंटरची उद्घाटन करण्यात आले. नानेली सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी यांच्या पुढाकारातून २५ बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. गावातील लोकांच्या सहभागातून व मेहनतीने बेडची व्यवस्था करण्यात आले. सर्वच स्तरातून सरपंच धुरी व सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. यावेळी तहसीलदार, पं. स.‌ गट विकास अधिकारी चव्हाण यांनी धुरी यांच्या कामाचे अभिनंदन ही केले.

या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार श्री.अमोल फाटक, पं. स.‌ गट विकास अधिकारी विजय चव्हाण, जि.प.शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, ग्रामसेवक सौ.माणगांवकर, विस्तार अधिकारी सखाराम सावंत, मंडल अधिकारी श्री भोई, शिक्षिका सौ.शेडगे, पोलिस पाटील संजय धुरी, स्वयंसेवक, खरूडे, मेस्त्री, युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी, आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा