You are currently viewing सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांना मातृशोक…

सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांना मातृशोक…

सावंतवाडी

मळगांव कुंभार्ली-रस्तावाडा येथील रहिवासी हेमलता बापू परब यांचे काल रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या मातोश्री होतं.
कै. परब या महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांच्या धाकट्या बहीण, तर जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा काँग्रेस नेते विकासभाई सावंत यांच्या त्या आत्ये होत्या. तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र उर्फ राजू परब व काँग्रेस महिला पदाधिकारी सुमेधा उर्फ नूतन सावंत यांच्या त्या आई, तर भाजपा महिला तालुकाध्यक्षा गीता परब यांच्या त्या सासू व झोळंबे हायस्कूलचे शिक्षक समीर परब यांच्या त्या काकी होत. हेमलता परब या गेले काही दिवस आजारी होत्या. त्यांच्यावर गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्या नंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. अशातच सोमवारी रात्री ११.३५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मूली, सूना, जावई, भाचे, पुतणे, पुतण्या, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा