You are currently viewing कणकवली न.पं.पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा सन्मान..

कणकवली न.पं.पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा सन्मान..

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार

कणकवली

कोरोना काळात कणकवली शहरात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी वैद्यकीय कोरोना योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र मेहनत घेतलेल्या न.पं.पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सदडेकर, विजय राणे, अमित राणे, संजय राणे, रोहन राणे यांचा स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सवी दिवशी शाल व श्रीफळ देऊन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सत्कार केला.

यावेळी सोबत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, आरोग्य सभापती अभि मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण, किशोर राणे, महेश दळवी, भाई साटम, राज नलावडे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा