You are currently viewing सावंतवाडीत प्रेरणाभूमीमार्फत रविवारी संविधान अभिवादन कार्यक्रम

सावंतवाडीत प्रेरणाभूमीमार्फत रविवारी संविधान अभिवादन कार्यक्रम

सावंतवाडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुंदर नगरीच्या पुण्यभूमीत समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्या विद्यमाने रविवार २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी संविधान अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम हा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक तथा प्रेरणाभूमीत सायंकाळी पाच ते सात या वेळेत होणार असून यावेळी प्रास्ताविका वाचन, भीम गीते, अभिवादन सभा व त्यानंतर आंबेडकर चौकातील कविता हा निमंत्रित कवींचा अभिनव कार्यक्रम होणार आहे.


या कार्यक्रमात आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कवी विठ्ठल कदम, संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर, उपाध्यक्ष भावना कदम, कार्याध्यक्ष अंकुश कदम, सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =