You are currently viewing देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा कुडाळ तालुक्याच्या वतीने आनंदाश्रय येथे साजरा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा कुडाळ तालुक्याच्या वतीने आनंदाश्रय येथे साजरा

*कुडाळ व ओरोस मंडलाच्यावतीने ‘सेवा पंधरवड्याचा’ शुभारंभ*

 

कुडाळ :

 

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना साठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम आधी विविध कार्यक्रम या सेवा पंधरवडा निमित्त राबविण्यात येत आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” कुडाळ व ओरोस मंडलाच्या वतीने शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी निराधार वृद्धांना अन्न धान्य वाटप तसेच वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांच्या समवेत केक कापण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल तसेच तालुका सरचिटणीस विजय कांबळी, देवेंद्र सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सर्व निराधार वृद्धांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

 

त्यावेळी आनंदाश्रय अणावचे बबन परब तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, एनटी आघाडी अध्यक्ष दीपक खरात, नगरसेवक निलेश परब, माजी सभापती नुतून आईर, ओरोस मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सौ सुप्रिया वालावलकर, स्नेहा सावंत, तुळसुली सरपंच नागेश आईर, युवा मोर्चाचे सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील, सरचिटणीस अमित तावडे, सरचिटणीस अवधूत सामंत, निखिल कांदळगावकर, प्रितेश गुरव, महिला मोर्चाच्या पिंगुळी अध्यक्ष सौ साधना माडये, कुडाळ महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ मुक्ती परब, अणावं शक्ती केंद्र प्रमुख प्रशांत परब, योगेश घाडी, जयेश चिंचलकर सह अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 11 =