You are currently viewing जिल्ह्यात वाढती कोरोनाची व्याप्ती पाहता रुग्णांना रक्त आणि प्लाझ्मा कमी पडण्याची शक्यता…

जिल्ह्यात वाढती कोरोनाची व्याप्ती पाहता रुग्णांना रक्त आणि प्लाझ्मा कमी पडण्याची शक्यता…

लोकप्रतिनिधींनी आणि रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरे घेण्याची गरज

विशेष संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवा नंतर कोरोनाचा प्रभाव वाढलेला दिसून येत आहे. जुलै अखेरपर्यंत शेकड्यात असलेले कोरोनाचे आकडे सप्टेंबर महिन्याच्या मध्यात  दोन हजारी मजल पार करून गेले आहेत. कोरोनाच्या विळख्यामुळे कित्येक रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. कोरोना व्हायरसमुळे शरीरातील रक्ताच्या गुठळ्या होत असल्याने रुग्ण दगावण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कित्येक रुग्णांना रक्त आणि प्लाझ्मा यांची सुद्धा गरज पडत आहे. सावंतवाडी शहरात देव्या सुर्याजीच्या युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी रक्तदान शिबिर घेतली जातात, तसेच तात्काळ गरज भासल्यास संघटनेच्या युवकांकडून रक्तदान केले जाते. ओरोस येथे रक्तगट नुसार प्लाझ्मा सुद्धा उपलब्ध असते, परंतु वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे रक्त आणि प्लाझ्मा कमी पडण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी प्रमाणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधूनही लोकप्रतिनिधींनी, नेत्यांनी युवकांना प्रोत्साहित करून रक्तदान शिबिरे भरवून ब्लड बँकेमध्ये रक्ताची कमी पडू नये याची दक्षता घेणे जरुरीचे आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांवर त्याचा परिणाम जास्त होत असून काही रुग्ण कोरोनाच्या सावटाखाली इतर आजारांवर दुर्लक्ष झाल्याने प्राणास मुकले आहेत.
जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी, नेते, यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर घेऊन जिल्ह्यात रक्त आणि प्लाझ्माचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून रक्ताच्या अनुपलब्धतेचा प्रश्न जिल्ह्याच्या ब्लड बँकेत निर्माण होणार नाही, आणि रुग्ण गंभीर असताना रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी वणवण करावी लागणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =