You are currently viewing ज्ञानवर्धिनी कॉलेज तळेरे येथे मुंबई विद्यापीठचा कलीनरी आर्ट व एम. कॉम अभ्यासक्रम सुरू.

ज्ञानवर्धिनी कॉलेज तळेरे येथे मुंबई विद्यापीठचा कलीनरी आर्ट व एम. कॉम अभ्यासक्रम सुरू.

संपूर्ण कोकण विभागात पाकशास्त्र व हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा कोर्स प्रथमच.

ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट तळेरे या संस्थेला यावर्षी पासून महाराष्ट्र शासनाने बी.ए. कलीनरी आर्ट व एम. कॉम. ऍडव्हान्स अकाऊंट या दोन नव्या अभ्यासक्रमाला परवानगी दिलेली आहे. कलीनरी आर्ट हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठा अंतर्गत सध्या मुंबईतील दोन कॉलेज मध्ये सुरु असून कोकणातील इतर पाच जिल्ह्यात प्रथमच पाकशास्त्र व हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक दालन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खुले झाले आहे.

बारावीच्या नंतर कुठल्याही शाखेच्या विध्यार्थ्यांना या कोर्स साठी प्रवेश घेता येत असून तीन वर्षांचा हा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे. महाविद्यालयाने या कोर्सच्या प्रशिक्षणसाठी उच्च दर्जाचे किचन प्रयोगशाळा उपलब्ध केले असून विध्यार्थ्यांना होस्टेल सुविधा तसेच समाज कल्याण विभागाची शिक्षण शुल्क सुविधेचा लाभ घेता येणार आहे. विध्यार्थ्यांना प्रात्यक्षिक साठी सौदी अरेबियाच्या अल बर्टझो या सप्ततारांकित क्रुझ कंपनी बरोबर करार केलेला असून गोवा, मुंबई व दिल्ली येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये प्रशिक्षणची व्यवस्था केलेली आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यावर विध्यार्थ्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध असून संस्था कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीची खात्री देत आहे.

मुंबई विद्यापीठाचे कला व वाणिज्य हे पदवी अभ्यासक्रम सुरू असून या वर्षी पासून एम कॉम हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला आहे. तसेच नर्सिंग विभागात ए एन एम हा कोर्स गेली दहा वर्षांपासून सुरू असून या वर्षी पासून जी एन एम हा कोर्सही सुरू होत आहे. या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज वितरित करण्यासाठी सुरुवात झालेली असून महाविद्यालयाच्या www. dnyanvardhini.org या संकेतस्थळावर सुद्धा ऑनलाइन उपलब्ध आहेत. तरी विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश नोंदवावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन डॉ अभिनंदन मालंडकर यांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + one =