You are currently viewing जागतिक शिक्षणासोबत संस्कृतीही जपा

जागतिक शिक्षणासोबत संस्कृतीही जपा

*जागतिक शिक्षणासोबत संस्कृतीही जपा*

*अंकुश चौधरीः ‘एमआयटी एडीटी’च्या ‘पर्सोना ऑफ द ईअर’ पुरस्कारांचे वितरण*

पुणेः

विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच हाॅलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी विविध कलांचेही शिक्षण देणे ही सध्या काळाची गरज आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण देत असताना त्यांना आपली संस्कृती व परंपरांचा देखील सातत्याने सहवास द्यायला हवा, आणि अगदी तशाच पद्धतीचे शिक्षण एमआयटी एडीटी विद्यापीठातून विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहे, याचा मला अभिमान वाटतो. माझा सन्मान संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा देऊन व टाळ-मृदुंगाच्या गजरात करण्यात आला, यासारखे दुसरे भाग्य नाही असे, गौरोवोद्गार प्रसिद्ध सिनेअभिनेते व दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी काढले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सहाव्या ‘पर्सोना फेस्ट-२४’ निमित्ताने आयोजित ‘पर्सोना ऑफ द ईअर’ पुरस्कारांच्या वितरण समारंभात बोलत होते. याप्रसंगी, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, प्रसिद्ध लेखक शरद तांदळे, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, एमआयटी ‘मिटकाॅम’च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, डाॅ.संजय उपाध्याय, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.विरेंद्र शेटे, डाॅ.रजनीश कौर सचदेव-बेदी, डाॅ.नचिकेत ठाकूर, डाॅ.मिलिंद ढोबळे आदी उपस्थित होते.
एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून अंकुश चौधरी, आदिनाथ कोठारे, वंदना सेहगल आणि शरद तांदळे यांच्यासह विद्यापीठातील १८ विद्यार्थ्यांना त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल ‘पर्सोना ऑफ द ईअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुढे बोलताना अंकुश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत महाविद्यालयीन दिवसांचा पूरेपुर आनंद लुटण्याचे आवाहन करताना, ‘एमआयटी एडीटी’ इतका सुंदर कँम्पस आजवर पाहिला नसल्याचे म्हणत भरभरून कौतुक केले.
प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी यावेळी बोलताना आध्यात्माच्या माध्यमातून सर्वांगीन प्रगती साधत असताना विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण कसे प्रदान करता येईल याबद्दल विस्तृतपणे आपले विचार मांडले. तसेच त्यांनी सध्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रस्थासोबत सायबर गुन्हेगारीही वाढली आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले. तसेच, ही सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी वंदना सेहगल यांच्यासारख्या सायबर सिक्युरिटी तज्ञांचा मोठा हातभार लागत असल्यानेच त्यांना ‘वर्षातील सर्वोत्तम पर्सोना’ हा पुरस्कार प्रदान करत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रा.डाॅ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षण व सोबत त्यांच्यातील कलागुणांसह संशोधनवृत्तीला वाव देऊन व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘पर्सोना फेस्ट’ची संकल्पना मी मांडली. ‘पर्सोना’च्सा माध्यमातूनच देशाच्या कला, विज्ञान, तंत्रज्ञान संस्कृतीत भर घालण्याचा उद्देश होता व आज प्रा.डाॅ.मंगेश कराड व त्यांच्या टिमने अतिशय प्रभावीपणे दरवर्षी ही संकल्पना प्रत्यक्षात राबविल्याचा मला अभिमान आहे, असे म्हणत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक यावेळी केले.

*विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्ने पहा*

सामाजिक जीवनात द्वेशपूर्ण काम न करता प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड सरांप्रमाणे रचनात्मक काम करत राहिल्यास माणूस नक्कीच मोठा होतो. खरंतर ९० टक्के लोकांची यशस्वी झाल्यानंतरची भाषणे तयार असतात परंतू त्यांचे यशस्वी होणे बाकी असते. ‘गुत्तेदार’ या शब्दापासून सुरु झालेला माझा प्रवास आज ‘आंत्रप्रन्योर’ पर्यंत येवून पोचल्याचा आनंद आहे आणि ‘एमआयटी एडीटी’चा पुरस्कार स्विकारताना एक वर्तूळ पूर्ण झाल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो जोपर्यंत मार्ग सापडत नाही तोपर्यंत वाचत रहा, आणि मोठी स्पप्ने पहा, असे आवाहन प्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांनी याप्रसंगी केले.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा