You are currently viewing ३१ जुलैला सकाळी छेडण्यात येणार जन आंदोलन..

३१ जुलैला सकाळी छेडण्यात येणार जन आंदोलन..

बांदा :

३० तारीख पर्यंत मुदत देऊन सीमा खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व गोवा सरकारला समन्वय साधून सीमा खुले करण्याबाबत निर्णय घेण्याकरिता एक दिवसाची मुदत भाजपच्या वतीने देण्यात आली आहे. भाजपच्या भूमिकेला बांदा बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या सीमेलगतच्या गोव्यातील ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला आहे. दोन्ही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी ३१ रोजी सकाळी १० वाजता बांदा पत्रादेवी सीमेवर वाहतूक रोखत जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बांदा सरपंच अक्रम खान यांनी दिली आहे. जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दोन्ही प्रशासनाला निर्णय घेणे गरजेचे आहे.

सीमेवरील पेडणे तालूक्यातील जनता ही बांदा बाजारपेठेवर अवलंबून आहे. मात्र सीमेवर अडवणूक होत असल्याने तेथील लोकांना बांदा बाजारपेठेत येणे देखील मुश्कील आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाला पेडणे तालुक्यातील लोकप्रतिनिधी व जनतेचा देखील पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी सकाळी छेडण्यात येणाऱ्या जन आंदोलनात गोव्यातील सरपंच लोकप्रतिनिधी देखील सहभागी राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + one =