You are currently viewing तरंदळे ग्रामपंचायत तर्फे आधार कार्ड अपडेट साठी 18 रोजी कॅम्पचे आयोजन

तरंदळे ग्रामपंचायत तर्फे आधार कार्ड अपडेट साठी 18 रोजी कॅम्पचे आयोजन

कणकवली

आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तरंदळे ग्रामपंचायत वतीने व पोस्ट ऑफिस यांच्या वतीने अगदी माफक दरात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मंगळवार दिनांक 18.07.2023 रोजी सकाळी 9 वाजता तरंदळे ग्रामपंचायत येथे कॅम्प घेत आहोत.तरी गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या कॅम्प मध्ये सहभागी होवून सुवर्ण संधी घ्यावी ही विनंती.सर्वांसाठी हा कॅम्प आहे.अजून एक आपल्या साठी संधी आहे.ज्यांना pm किसान योजनेसाठी अकाउंट ओपन करायचे असतील त्यांना सुध्दा मंगळवारी 9 वाजता ग्रामपंचायत येथे अकाउंट ओपन करून भेटेल.त्यांनी 200 रुपया मध्ये अकाउंट ओपन करून घ्यावे.पोस्ट ऑफिस मध्ये असणाऱ्या इतर ही योजना सांगितल्या जातील. बँके पेक्षा पोस्ट हे विश्वासू आहे.आणि पोस्ट ऑफिस चा व्याजदर ही चांगला असतो.प्रत्येकाचं पोस्टात अकाउंट असणे गरजेचे आहे.चला तर मंगळवारी येवून पोस्ट ऑफिस च अकाउंट ओपन करूया.आणि इतर ही योजनांची माहिती घेवूया.आठवणीने मंगळवारी न विसरता सकाळी 9 वाजता या. असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − four =