You are currently viewing सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील धोकादायक दरडी व झाडांचा सर्वे करा – प्राजक्ता केळुसकर

सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील धोकादायक दरडी व झाडांचा सर्वे करा – प्राजक्ता केळुसकर

सावंतवाडी

येथील बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यावरील धोकादायक दरडी व झाडांचा सर्वे करा,गाळेल सारखी घटना पुन्हा उद्भवू नये,यासाठी दक्षता घ्या,अशी मागणी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर यांनी पंचायत समितीच्या बैठकीत केली. यावेळी सर्व सदस्यांनी त्यांना अनुमोदन दिले. दरम्यान गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर साथ रोग पसरू नये,यासाठी आधीच उपाययोजना करा,अशा सूचनाही उपस्थित सदस्यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या.येथील पंचायत समितीची मासिक सभा आज सभापती निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी उपसभापती शितल राऊळ,पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर,बाबू सावंत,संदीप नेमळेकर आदी उपस्थित होते. सावंतवाडी-दाणोली मार्गावर असलेल्या धोकादायक झाडांची तात्काळ विल्हेवाट लावा, अशा सूचना यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले जाईल,असे पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित सदस्यांनी सांगितले.दरम्यान जिल्ह्यात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये,यासाठी सर्व नदीपात्रातील गाळ उपसा करा,तसेच ज्या नदीपात्रांत अतिक्रमण झाले आहे.त्याचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करा,अशी मागणी पंचायत समिती सदस्य रविंद्र मडगावकर यांनी सभागृहाकडे केली.येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीतील पाणी बाहेर शिरल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे काही नदीपात्रात अतिक्रमण झाल्याने हा प्रकार पुन्हा पुन्हा घडत आहे.त्यामुळे त्याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी उपस्थितांनी केली.हा विषय शासन स्तरावर मांडून त्यावर योग्य तो निर्णय घ्या,अशी मागणी उपस्थितांनी केली.

आमदार निधीतून मंजूर झालेल्या कामांना निधी मंजूर होत नसल्याने निधी अभावी ही कामे कोणताही ठेकेदार हाती घेत नसल्याने रखडली आहेत. निवडणुकीचा कालावधी बघून आमदार निधीतून कामे मंजूर केली जातात.हे लापाछपीची कार्यक्रम बंद करा,असे संदीप नेमळेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eleven =