You are currently viewing सत्ताधा-यांकडुन शेतक-यांची चेष्टा : राजेंद्र म्हापसेकर

सत्ताधा-यांकडुन शेतक-यांची चेष्टा : राजेंद्र म्हापसेकर

सिंधुनगरी
खरीप हंगाम जवळ आला तरी अद्यापर्यंत शेतक-यांना सवलतीच्या दरात मिळणारे खत आणी सुधारीत भात बियाणे देण्यास शासन अद्यापर्यंत अपयशी ठरले असुन ही सत्ताधा-यांकडुन शेतक-यांची चेष्टा असल्याचे सांगत बजाज राईस मिल मार्फत खरेदीविक्री संघातील भात बियाणे उचल करण्यास आदेश देऊनही भाताची अद्याप बजाज राईस मिलने उचल न केल्याने गोदामात भात पडुन आहे त्यामुळे खत आल्यास ते कोठे उतरवुन घ्यावे हा प्रश्न खरेदी विक्री संघापुढे निर्माण झाला आहे. या अनागोंदी कारभाराला जिल्हाचे पालकमंत्री आणी प्रशासन जबाबदार असल्याचा टोला जि.प.उपाध्यक्ष तथा कृषि समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी लगावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हातील शेती हंमाग सुरु झाला असुन जिल्हातील सर्व सोसायट्या मध्ये खत विक्रीस सुरवात झालेली आहे. शेती हंगामाच्या अनुषंगाने यावर्षासाठी बियाण्यांच्या मागणीमध्ये सुधारीत 7350 क्विंटल / संकरीत -625 क्विंटल असे एकुण मिळुन 7975 क्विंटल बियाण्याची मागणी व 17570 मेट्रिक टन ऐवढया खताची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. त्यानुसार या जिल्हयासाठी दि.23/05/2021 पर्यंत 2747 क्विंटल बियाणे 2902 मेट्रीक टन खत प्राप्त झालेले आहे. म्हणजेच मागील वर्षीचा आढावा घेता 2020 मध्ये -4263 क्विंटल बियाण्याची झालेली विक्री व केलेल्या मागणी प्रमाणे तब्बल 4603 क्विंटल एवढे क्विंटल बियाणे व 14668 मेट्रिक टन ऐवढे खत अद्यापही जिल्हात उपलब्ध झालेले नाही. सद्यस्थितीत लॉकडाऊन सुरु असल्याने सर्व अडचणींवर मात करुन खतासाठी किंवा बियाण्यासाठी शेतक-यांना वारंवार तालुक्याच्या ठिकाणी येणे जीकरीचे होत आहे. शेतक-यांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्णाकडे यापुर्वी लक्ष देणे आवश्यक होते. मात्र जिल्हाचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तसेच संबधित यंत्रणा हा विषय हातळण्यात अपयशी ठरली आहे.
गतवर्षी खरेदी करण्यात आलेल्या धान्यासाठी शासकीय गोदाम वापरले गेले आहे. या मधील भाताची उचल बजाज राईस मिलने अद्रयाप केलेली नाही त्यामुळे जिल्हात येणारे खत उतरवून ठेवण्यास अडचणी निर्माण होणार नाही. भाताची गोदाममधील उचल वेळीच झाली असती तर खत उपलब्ध झाल्यास ते ठेवायचे कोठे हा प्रश्ण उद्भवला नसता या अनागोंधी कारभाराला जबाबतदार कोणे असेही म्हापसेकर यांनी म्हटले असुन शासन आणी प्रशासनाकडून जिल्हयातील शेतक-यांची निव्वळ गळचेपी करण्यात येत आहे असे ते म्हणाले.
तोक्ते वादळातील मदत निसर्गचक्री वादळाप्रमाणे नको.
गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची अद्यापही भरपाई मिळालेली नसताना सद्य:स्थितीत लक्षणिय रित्या जिल्हयास प्रभावित केलेल्या तोक्ते चक्रिवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असुन या तोक्ते वादळाची तरी शेतक-यांना आणी आपत्तग्रस्थांना मदत मिळावी पालकमंत्री यांनी नुसत्या घोषणाच करुन नये असेही राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगत सिंधुदुर्गजिल्हात आंबा,नारळ,सुपारी,काजु,केळी,अननस,कलिंगड,शेंगदाणा आदी पिकांचे सुमारे 3600 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे.याचबरोबर काही पशुपालक शेतक-यांचे पशुधनाचेही नुकसान झाले आहे तथापी शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार नुकसान हे हेक्टरी नमुद करणे क्रमप्राप्त असलेने आंबा,काजू,नारळ,सुपारी या नुकसानग्रस्त झालेल्या झाडांचे योग्य मुल्यांकन न झाल्यास परिणामी नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळताना अडचणी येणार आहेत. शासनाकडुन शेतक-यांना आवश्यक व पुरेपुर मदत न देताच नुकसान भरपाईच्या नावाखाली निसर्ग वादळाच्याच धरतीवर तोक्ते वादळातील नुकसानग्रस्थ शेतक-यांच्या,कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच कार्यक्रम शासनाने निश्चित केलेला आहे. असा टोला उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी लगावलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − fifteen =