You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयात पारंपरिक दिन उत्साहात साजरा

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात पारंपरिक दिन उत्साहात साजरा

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात पारंपरिक दिन उत्साहात साजरा

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे आज पारंपारिक दिन ‘कलादर्पण’ उत्साहात साजरा करण्यात आला.या पारंपरिक दिनाचे उद्घाटन
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा
राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच लोककला अध्ययन केंद्राचेही उद्धाटन करण्यात आले.या प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी
सौ.श्रद्धाराजे भोंसले,संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, सहाय्यक संचालक अॅड.श्यामराव सावंत, सदस्य डॉ.सतीश सावंत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.एम ए ठाकूर, महाविद्यालयाच्या सांस्कृतीक विभागाचे समन्वयक डॉ. डीजी बोर्डे, सह समन्वयक डॉ. एस एम बुवा , सदस्य डॉ. एस ए देशमुख, डॉ. व्ही पी सोनाळकर, प्रा. सौ पि डी सावंत, प्रा.ए ए कांबळे , विद्यार्थी प्रतिनिधी आप्पा हिर्लेकर, महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स, सोलो डान्स, ग्रुप डान्स, सोलो सिंगिंग, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, आधी विविध कला प्रकारामध्ये सहभागी होऊन पारंपारिक दिन अतिशय उत्साहाने साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा