You are currently viewing सातेरी देवस्थान, कामुर्ली म्हापसा येथे यांचे दिवजोत्सवात १ लाख नामस्मरण व प्रबोधन

सातेरी देवस्थान, कामुर्ली म्हापसा येथे यांचे दिवजोत्सवात १ लाख नामस्मरण व प्रबोधन

 

श्रीदेवी सातेरी देवस्थान व महिला भगिनी मंडळातर्फे ,कामुर्ली बार्देश येथे दिवजोत्सव थाटात संपन्न झाला. यंदा प्रथमच दिवजोत्सवाला हरिनामाची जोड लाभली. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री सुहास वझे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिकरित्या १ लाख नामस्मरण झाले. सुरूवातीला देवस्थानतर्फे तसेच वाहतूक खात्याचे निरीक्षक श्री लाडु हरी गावकर यांनी सुहास वझे यांचे पुष्पहार अर्पण केला व इतरांना गुलाब देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला पुरुष, महिला तसेच बालवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या प्रबोधनात बोलताना वझेबुवा म्हणाले की, आज आपल्या सर्व हिंदुबांधवाना आपल्या धर्माचे, संस्कृतीचे ,उत्सवाचे महत्त्व सांगण्याचे संस्कार प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. देव, देश, धर्म टिकला तरच आम्ही टिकणार. जातपात, भेदभाव विसरून आज सर्व समाजातील लोकानी एकत्र येऊन समाजात एकता, बंधुभाव, मानवता टिकवली पाहिजे.
प्रत्येक उत्सवाला हरिनामाची जोड दिली पाहिजे,असे ते म्हणाले. सौ. दिक्षा नाईक गावकर म्हणाल्या की , आयुष्यात आज प्रथमच आमच्या दिवजोत्सवात हरिनाम व प्रबोधन झाले .आमचे मन प्रसन्न झाले, उत्सवाचे महत्त्व समजले,सर्व महिला हरिनामात रंगून गेल्या, श्री सुहास बुवा वझे यांचे कार्य ईतिहास घडविणारे, भक्ती वाढविणारे आहे. संपूर्ण गोव्यात असे कार्यक्रम करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात वझेबुवाना दरबार कामुर्ली येथील श्री शिवानंद चंद्रकांत साळगावकर, वळवईचे श्री दामोदर कामत, संतोष कुर्टिकर, तसेच किर्तनकार कु मनस्वी नाईक, समीक्षा कुर्टीकर, व शर्वेश शिवानंद साळगावकर यांनी सहकार्य केले. शेवटी सौ समिधा गावकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 7 =