You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी
सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे तालुका उपाध्यक्ष मा. संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात कोरोना जागरूकता विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेला दोडामार्ग, बांदा, ओटवणे चराठा व सावंतवाडी शहरातील बहुसंख्य शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 28 फेब्रुवारी रोजी वाढदिवसादिनी राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.गंगाधर काळकुट्टे यांचे हस्ते होणार आहे.
संघटने कडून आयोजित स्पर्धेला तालुकाध्यक्ष पूजा विजय गावडे ,शहराध्यक्ष संचिता सचिन गावडे, सदस्य सपना आनंद गावकर, मानसी मनोहर पाटील, सौ गावकर कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + eight =