You are currently viewing आजच्या महिला चुल आणि मुल याच्यापुढे जाऊन सर्वच क्षेत्रात करत आहेत उल्लेखनीय कार्य…

आजच्या महिला चुल आणि मुल याच्यापुढे जाऊन सर्वच क्षेत्रात करत आहेत उल्लेखनीय कार्य…

सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांचे प्रतिपादन;

कर्तबगार महिलांचा करण्यात आला सन्मान…

सावंतवाडी

संपूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्गात सर्वात जास्त महिलांचे प्रमाण असून, आजच्या काळात चूल आणि मूल यापुढे जाऊन महिलांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक समाज सेविकांनी महिलांचा विकास व्हावा यासाठी काम केले आहे. त्यांच्यामुळेच आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषा सोबत काम करत आहेत. असे मत आज राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी सावंतवाडी येथे स्त्री शक्ती सन्मान या आयोजित कार्यक्रमात केले आहे. अर्चना फाऊंडेशन च्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी घारे परब यांच्या हस्ते कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी त्या म्हणाल्या की, खर तर वर्षाचे ३६५ दिवस हे महिलांचेच असतात, परंतु, आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आज विविध स्तरातून महिलांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहे. माझी राजकारणाची सुरुवात देखील एका सरपंच पदावरून झाली. तसेच अनेक महिला लहान पदावरून आज मोठ्या पदापर्यंत मजल मारली आहे असे ही ते यावेळी बोलताना म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा