You are currently viewing नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या दणक्यांनंतर ‘आनंदाचा शिधा’ ऑफलाईन

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या दणक्यांनंतर ‘आनंदाचा शिधा’ ऑफलाईन

दोडामार्ग

कसई दोडामार्ग शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रास्त दराच्या धान्य दुकानात राज्य शासनाच्या “आंनदाचा शिधा” योजने अंतर्गत १०० रुपयात ठरलेल्या चार वस्तूंचे वाटप करण्यात येत होते, काल दिपावलीची सुट्टी असल्याने हे रास्त दराचे धान्य दुकान बंद होते. त्यामुळे आज या दुकानावर ग्राहकांची गर्दी होती. मात्र या दुकान चालवणाऱ्या दुकानदाराने सदर आनंदाचा शिधा ऑफलाईन मिळणार नाही असे सांगून हा शिधा देण्यास नकार दिल्यामुळे उपस्थित ग्राहकांची निराशा झाली. यावेळी ही गोष्ट नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या कानावर येताच त्यांनी या ठिकाणी येत तहसिलदार तसेच पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदरचा “आनंदाचा शिधा” ऑफलाईन मिळावा असे आदेश असताना हा दुकानदार मनमानी करतो आहे असे सांगत या दुकानदाराची कानऊघडणी केली व त्याला ऑफलाईन शिधा वितरित करण्यास भाग पाडले.

रास्त दराच्या धान्य दुकानदाराच्या मनमानीला नगराध्यक्षां कडून “ब्रेक” लावण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी साधारण १०० पेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतला.
यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांसह पिकी कवठणकर, विनायक खडपकर, विशाल चव्हाण, आनंद गवस आदी नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा