You are currently viewing खारेपाटण गावाला आजच तातडीने निधी मंजूर करून देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

खारेपाटण गावाला आजच तातडीने निधी मंजूर करून देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

खारेपाटण :

गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने शुकनदीला पूर आल्याने खारेपाटण शहरात पूराचे पाणी घुसले होते. यामुळे येथील व्यापारी, नागरिक आणि शेतकरी वर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री ना.उदय सामंत यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या समवेत आज सोमवारी सकाळी १०.०० वाजता खारेपाटण शहराला तातडीची भेट दिली. येथील पूर परस्थितीची पाहणी करून येथील नागरिकांशी संवाद साधला व समस्या जाणुन घेतल्या.

यावेळी माजी युवासेना जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख शरद वायांगणकर, महिला उपजिल्हा संघटक मिनल तळगावकर, शिवसेना खारेपाटण विभागप्रमुख महेश कोळसुलकर, उपविभाग प्रमुख दया कुडतरकर, युवासेना प्रमुख तेजस राऊत, शाखाप्रमुख शिवाजी राऊत, प्रणय उपाध्ये, भूषण कोळसुलकर, संतोष गाठे, गिरीश पाटणकर, आदिनाथ शेट्ये, प्रज्योत मोहिरे, दिगंबर गुरव, चेतन राऊत, गौरव शेलार, ओंकार गाठे, वैभव कांबळे, संतोष तुरळकर, परवेज पटेल, चंद्रकांत शेट्ये, गणी काझी, सत्यवान शिंदे, धोंडीराम साटविलकार, बंड्या ढेकणे, सुधाकर ढेकणे, मुबिन सारंग आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांना खारेपाटण पूर परिस्थिती बाबत माहिती दिली व खारेपाटण गावाला पर्यायी रस्त्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार आर.जे.पवार, मंडळ अधिकारी मंगेश यादव आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पूर परिस्थिती नंतर खारेपाटण गावाचा संपर्क तुटतो, सर्व रस्ते पाण्याखाली जातात त्यामुळे खारेपाटण गावाला तातडीने पर्यायी रस्ता नडगिवे वायंगणी, खारेपाटण कर्लेवाडी, पंचशील नगर, कोष्टेवाडी मार्गे बंदरगाव असा नवीन रस्ता प्रशासनाच्या वतीने बनवून देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांना सांगितले.

यावेळी संदेश पारकर यांनी खारेपाटण गावाला भरगोस निधी मंजुर करून देऊन प्राधान्याने शहरातील सर्व समस्या मार्गी लावण्याची मागणी केली असता पालकमंत्री महोदयांनी आजच तातडीचा निधी मंजुर करुन देण्याची ग्वाही दिली.

खारेपाटण शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर यांनी शिवसेनेच्या वतीने खारेपाटणच्या विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना दिले.

 

निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:-

१) खारेपाटण बसस्थानक ते शिवाजी पेठ घोडेपाथर बंदर पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे व पक्की भुयार गटार बांधणे.

२) डॉ. गाड दुकान ते बंदरगाव पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढविणे व शुक नदीला १०० मीटर संरक्षक भिंत बांधणे.

३) पूर परिस्थिती नंतर पर्यायी रस्ता म्हणून वायंगणी कडून कर्लेवाडी, पंचशीलनगर मार्गे बाजारपेठेत येणार दीड किलोमीटर पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.

४) मुंबई – गोवा महामार्ग ते कपिलेश्वर मंदिर ते कालभैरव मंदिर मार्गे खारेपाटण बाजारपेठेत येणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.

५) श्री विष्णू मंदिर बाजारपेठ ते कोष्ट्येवाडी कडे जाणारा रस्ता बनविणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =