सातोसे मार्गे सातार्डा वस्तीची एसटी बस सुरू…

सातोसे मार्गे सातार्डा वस्तीची एसटी बस सुरू…

तळवणेकर यांच्या मागणीला यश

सावंतवाडी

सोमवार पासून सातोसे मार्गे सातार्डा वस्तीची एसटी बस चालू करण्यात आली आहे. याबाबत आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी मंगेश तळवणेकर यांना लेखी पत्र दिले आहे. ही बस चालू करण्यासंदर्भात मंगेश तळवणेकर यांनी आगार प्रमुखांना निवेदन देऊन मागणी केली होती, ही बस चालू झाल्याने त्यांच्या मागणीला यश आले आहे. या पत्रात पडोळे यांनी म्हटले की, सध्या बेस्ट उपक्रमाच्या कामगिरीसाठी सावंतवाडी आग्रहातून पंधरा एसटी बस वीस वाहक मुंबई येथे पाठविण्यात आले आहे त्यामुळे चालक वाहक तसेच गाड्यांच्या कमतरतेमुळे सध्याच्या स्थितीत वस्तीच्या गाड्या सुरू करण्यात अडचणी येत आहेत या या वस्तीच्या शालेय फेऱ्या सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येत आहे तसेच पडलोस मार्गे सातार्डे एसटी बस आठ ते दहा दिवसात सुरू करणे बाबत कार्यवाही करण्यात येत आहे असे आश्वासन आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी तळवणेकर यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा