You are currently viewing संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त परीट समाजाच्या वतीने विविध उपक्रम

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त परीट समाजाच्या वतीने विविध उपक्रम

सावंतवाडी प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गाडगे बाबा पुण्यतिथी २० डिसेंबर रविवारी रोजी वटसावित्री हॉल, खासकीलवाडा, सावंतवाडी येथे कोविड साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे.

यावेळी श्री संत गाडगेबाबा भाजी मंडई येथे सकाळी ७.०० वाजता साफसफाई करण्यात येणार आहे. तसेच सकाळी ९.३० वाजता श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. आरती व प्रसाद यांचे वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर ११.०० वाजता राणी जानकीबाई सुतिकागृह व कुटीर रुग्णालयांमध्ये फळे व प्रसाद वाटप देखील करण्यात येणार आहेत.

कोविडच्या सद्यपरिस्थितीमुळे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी सर्व परीट बांधव व भगिनींनी, भाविकांनी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर ९४२२५८६११४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर व तालुका सरचिटणीस योगेश आरोलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 16 =