You are currently viewing वैभववाडी तालुका काँग्रेसची बैठक संपन्न

वैभववाडी तालुका काँग्रेसची बैठक संपन्न

*वैभववाडी तालुका काँग्रेसची बैठक संपन्न*

वैभववाडी

वैभववाडी तालुका काँग्रेसची बैठक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली वैभववाडी काँग्रेस कार्यालय येथे संपन्न झाली.
नवनियुक्त तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव यांचा जिल्हा काँग्रेस मार्फत सत्कार करण्यात आला.
पक्ष संघटना वाढीसाठी तालुक्यात गाववार कार्यकर्ते व काँग्रेस हितचिंतक यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना पक्षसंघटनेत सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे आगामी काळात होणाऱ्या जिल्हापरिषद पंचायत समीती निवडणूका होणार आहे त्या दृष्टीकोनातून चाचपणी करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, आज काँग्रेसचा काळ अडचणीचा असला तरी भविष्यात देशात,राज्यात काँग्रेस हाच पक्ष एक नंबरला असणार आहे. आज सर्वसामान्य जनतेला काँग्रेसचे पूर्वीचे दिवस आठवायला लागलेत आणि पुर्वीचे दिवस चांगले होते असे सर्वसामान्य जनता म्हणत आहे. त्यामुळे काँग्रेसला पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त होणार त्यामुळे आपण आपला गाव आणि तालुका सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत.
जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश मोर्ये यांनी पक्षा मध्ये एकजूट ठेवून पक्ष संघटनेचे काम करा येणारा पुढील काळ आपलाच आहे असे सांगीतले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रविण वरुणकर, आनंद पवार, तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, माजी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, अहमद बोबडे, वसंत नाटेकर, दादा नेवरेकर, अशोक राणे, प्रभाकर इस्वलकर, दिलीप राणे, सिद्धार्थ कांबळे, किशोर जाधव, दस्तगीर नाचरे,रमेश देवरुखकर, मुस्ताफिर पाटणकर,सदानंद कदम,कासीम चोचे इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा