You are currently viewing वैभववाडीत स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडीत स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी :

स्वातंत्राच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त वैभववाडी स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज वैभववाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संभाजी चौकात सकाळी ११ वाजता सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ठिक ११ वाजता संभाजी चौक येथे उपस्थित शासकीय अधिकारी कर्मचारी, विविध संस्था पदाधिकारी, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न झाले.

त्यानंतर नगरपंचायत कार्यालयात माजी सैनिकांचा गुलाबपुष्प, शाल व श्रीफळ देऊन सत्कार समारंभ करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाला तहसीलदार रामदास झळके, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, वाभवे वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव तसेच सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व वाभवे वैभववाडी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक पालक तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 5 =