You are currently viewing कामगार कोरोना बाधित असताना कंपनी सूरू कशी? दोडामार्ग मध्ये चर्चा

कामगार कोरोना बाधित असताना कंपनी सूरू कशी? दोडामार्ग मध्ये चर्चा

दोडामार्ग :

दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून अनेक उद्योगधंदे व्यापार बंद पडले आहे. मात्र एका गावात एक मोठे व्यावसायिक केंद्र असलेली कंपनी सुरू असून या कंपनीतील १० कामगार कोरोना पॉझिटिव्ह आल्याची चर्चा आहे. कामगार पॉझिटिव्ह आले असताना ही कंपनी सुरू कशी ? याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान या कंपनीशी संबंधित मालाची वाहने गोव्यातून ये-जा करीत आहेत. सर्वसामान्यांना वेठीला धरणारी यंत्रणा या कंपनीकडे कसे काय दुर्लक्ष करते असा सवाल उपस्थित होत आहे?

 

तालुक्यात एका कंपनीत १० जण पॉझिटिव्ह आल्याची चर्चा असून कंपनीशी संबंधित सर्व यंत्रणा हडबडली आहे. मात्र कंपनीचे काम चालूच असून कंपनीत कच्चा आणि पक्का माल पुरवणारी वाहनेही गोव्यातून ये-जा करीत आहे. या वाहनांच्या चालकांना कोणते पास दिले आहेत ? त्यांची चाचणी कुठे आणि केव्हा झाली ? त्यांना गोव्यात कसा प्रवेश मिळतो ? शिवाय कोरोनाचे खळबळ माजलेल्या गोव्यातून आलेली वाहने दोडामार्ग मध्ये कशी प्रवेश करतात ? त्यांना कोण प्रवेश देतो याची ? चौकशी करावी अशी मागणी दोडामार्ग तालुक्यातून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − nineteen =