You are currently viewing मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून मनसे नेते शिशिर सावंत यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून जिव्हाळा आश्रमाला जीवनापयोगी वस्तूंचे वाटप

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून मनसे नेते शिशिर सावंत यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून जिव्हाळा आश्रमाला जीवनापयोगी वस्तूंचे वाटप

कुडाळ

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा.श्री. शिशिर सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी (रायवाडी) येथील “जिव्हाळा आश्रमाला” १०० किलो तांदूळ व ईतर कडधान्य महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना माजी जिल्हाध्यक्ष श्री. कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी जिल्हाध्यक्ष श्री.धिरज परब,श्री. हेमंत जाधव, श्री सचिन सावंत, श्री.सागर सावंत,श्री. राजेश माने,श्री.विकास लाड,श्री. हरिश गुंजाळ, श्री.सखाराम सावंत,श्री.जगन्नाथ गावडे, श्री.प्रथमेश धुरी, श्री. राजन मेस्त्री व कार्यकर्ते उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेशजी बिर्जे यांनी सर्वांचे स्वागत केले तर श्री. जयप्रकाश प्रभू यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. आभार श्री. प्रसाद पोईपकर यांनी मानले.याप्रसंगी आश्रमाला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन उपस्थित सर्वानी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा