You are currently viewing सातरल-कासरल सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचा विजय; शिवसेनेचा पराभव

सातरल-कासरल सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचा विजय; शिवसेनेचा पराभव

कणकवली तालुक्यातील सातरल-कासरल सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव लिंग पावनादेवी समृद्धी पॅनल च्या सर्वच्या सर्व ११ उमेदवारांनी विजय मिळविला. शिवसेना पक्षाच्या प्रतिस्पर्धी पॅनलच्या उमेदवारांनचा यात पराभव झाला.

मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत भाजपा पुरस्कृत चंद्रकांत राणे, गणेश सावंत, मिलिंद सावंत, दत्तात्रय आमडोसकर, कल्पना खंदारे, सुरेश चव्हाण, विष्णू चोरगे, बाबाजी राणे, सदाशिव राणे, विनोद परब, नेहा सावंत हे उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवारांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, पं स माजी उपसभापती महेश गुरव, भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनु सावंत, पिसेकामते सरपंच सुहास राणे, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, समीर प्रभुगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा