You are currently viewing भाजपचे कुडाळ येथे आंदोलन…

भाजपचे कुडाळ येथे आंदोलन…

कुडाळ

ठाकरे सरकार मधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत “महाआघाडी” सरकार मधील “महाभ्रष्टाचार” मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चव्हाट्यावर आणला आहे..
यामुळे महाराष्ट्रात ‘आंधळं दळत कुत्रा पीठ खातो’ अशी दयनीय अवस्था करणाऱ्या महाआघाडी ठाकरे सरकारच्या दृष्कृत्यांचा निषधे करण्यासाठी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा या मागणीकरिता कुडाळ मंडलातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी यांनी आज रविवार दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजता कुडाळ पोस्ट ऑफिस चौकात भ्रष्ट सरकार व अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले.

यावेळी राजू राऊळ, अस्मिता बांदेकर, संध्या तेरसे, बंड्या सावंत, रेखा काणेकर, आरती पाटील, सुनील बांदेकर, गुरू कुंभार, निलेश परब, राकेश नेमलेकर, साक्षी सावंत, रेवती राणे, अजय आकेरकर, श्रावण शिरसाट, मुक्ती परब अदिती सावंत, ममता कुंभार आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा