You are currently viewing कुडाळ येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कुडाळ येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कुडाळ :

 

हिंदुहृदयसम्राट वंदनीय मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास माजी आमदार जीजी उपरकर यांनी भेट दिली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महीला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, तालुका प्रमुख राजन नाईक, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगांवकर, कृष्णा धुरी सचिन कदम, एस टी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, ओबीसी सेल शहर प्रमुख राजू गवंडे,माजी नगरसेवक बाळा वेंगुळेकर, सचिन काळप, उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, ज्येष्ठ शिवसैनिक दाजी आईर, वसंत कोनकर , बाबल गावडे, दिपक गावडे, हेमंत पिंगुळकर, माजी सरपंच सुनील सावंत, अक्रम साठी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा