You are currently viewing शासन दरबारी वीज कंत्राटी कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी संघर्षमय लढा न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवणार… 

शासन दरबारी वीज कंत्राटी कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी संघर्षमय लढा न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवणार… 

शासन दरबारी वीज कंत्राटी कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी संघर्षमय लढा न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवणार…

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे राज्य अध्यक्ष निलेश खरात

कुडाळ

शासन दरबारी वीज कंत्राटी कामगारांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आपला संघर्षमय लढा न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवला पाहिजे लढ्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे राज्य अध्यक्ष निलेश खरात यांनी केंद्रीय कार्यकारणी सभेच्या वेळी कुडाळ येथे केले
श्रम हीच आराधना हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ या संघाची विविध प्रश्न या अनुषगाने केंद्रीय  कार्यकारिणीची बैठक येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर च्या सभागृहात निलेश खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री खरात यांच्या हस्ते झाले यावेळी  भारतीय मजदूर संघाचे नेते हरी चव्हाण महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघाचे महामंत्री सचिन मेंगाळे कार्याध्यक्ष अमर लोहार राहुल बोडके संघाचे जिल्हाध्यक्ष आनंद लाड महाराष्ट्र राज्यातून संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य आदी  उपस्थित होते
यावेळी बोलताना श्री खरात म्हणाले महाराष्ट्र राज्यात वीज कंत्राटी कामगार  संघाची  सर्वाधिक सभासद संख्या ही आपली आहे वीज कंत्राटी कामगारांच्या न्याय्य प्रश्नासाठी आपण सतत लढा देत आहोत यापुढेही देत राहणार   या लढ्यात आपल्याला भारतीय मंजूर संघाने सातत्याने साथ दिली आहे आपली एक विचारधारा आहे त्या विचारधारेनुसार आपण  कार्य करत आहोत वीज कंत्राटी कामगारांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ देणार नाही  त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालेलो आहोत गेली सात आठ वर्षे आपण सातत्याने न्याय्य हक्कासाठी शासन दरबारी आपल्या कैफियती मांडतो आपली संघटना ही राजकारणविरहित असून कोणाचे सरकार आले तरी न्याय्य प्रश्नासाठी आतापर्यंत लढलेली आहे अलीकडेच  न्याय्य हक्कांसाठी झालेल्या पाच ते नऊ मार्च या लॉंगमार्च आंदोलनात शासनास वेठीस धरले

आजपर्यंतच्या इतिहासात हे आंदोलन महत्त्वाचे ठरले आहे  2014 ते 19 युतीचे शासन कार्यरत असताना आपण त्यावेळी सुद्धा लढा दिला आहे तळागाळातील कंत्राटी कामगार हा  वीज महानिर्मिती महापारेषण महावितरण तिन्ही घटकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असताना  आपल्या कंत्राटी कामगारांना शासन दरबारी तुटपुंजा पगार न मिळता त्यांना नियमानुसार हक्काचा नियमाला धरून पगार मिळाला पाहिजे त्यांना कंत्राटीतून मुक्त करण्यासाठी आमचा लढा आहे हा लढा  लढण्यासाठी वीज कंत्राटी कामगार महाराष्ट्र संघ निश्चितच कार्यरत राहणार आहे कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला तर रुपये चार लाख मदत मिळते ही मदत फारच कमी आहे पण ही मदत मिळवून देण्यासाठी सुद्धा संघाने फार मोठे योगदान दिलेले आहे कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर संघटितपणा महत्त्वाचा आहे तो संघटित पणा कायमचा टिकवला पाहिजे   महानिर्मिती महापारेषण महावितरण हे त्रिवेणी संगम एकत्र आल्यास सरकारवर दबाव येईल आगामी काळात मतभेद न करता वीज उद्योगाची ध्येय गाठण्यासाठी सर्वांनी कार्य केले पाहिजे असे सांगितले भारतीय मजदूर संघाचे नेते हरी चव्हाण यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या या लढ्यात भारतीय मजदूर संघ नेहमीच कार्य करत राहील आता या मोहिमेत बांधकाम कामगार सुद्धा सहभागी झाला आहे  असे यावेळी सांगितले या कार्यात या बैठकीला महाराष्ट्र राज्यातून आलेल्या केंद्रीय कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये आनंद लाड लोकेश सांगवेकर मिलिंद कुडतरकर मधुकर माळी राहुल लभालकर मारुती गुंड सतीश पवार मनोज जामदार कृष्णन पवार गणेश देशमाने अमर पवार प्रशांत चव्हाण नीलेश गिरी रामकृष्ण मडके अमर गिरकर सुशील उपळकर मंदार चव्हाण जयेंद्र थुळ अभय चौगुले कुंदन शिंदे रुस्तम शिंदे अशोक खंदागळे मदन गलबे सुभाष कांबळे रखम गाडेकर सचिन भावसार विलास गुजर मोहन देशमुख विजय कांबळे अमोल भास्कर कमाल खान यांचा समावेश होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मेंगाळे यांनी केले आभार अमर लोहार यांनी मानले

कुडाळ
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघच्या वतीने केंद्रीय  कार्यकारिणी सभेचे उद्धाटन करताना निलेश खरात हरी चव्हाण सचिन मेंगाळे अमर लोहार राहुल बोडके आनंद लाड आदी

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा