कुर्ली खडकदारा येथील ओढ्याचे पाणी रस्त्यावर;फोंडा वरून वैभववाडीत येण्यासाठीचे लोरे व कुर्ली येथील मार्ग बंद

कुर्ली खडकदारा येथील ओढ्याचे पाणी रस्त्यावर;फोंडा वरून वैभववाडीत येण्यासाठीचे लोरे व कुर्ली येथील मार्ग बंद

फोंडा – कुर्ली – सडूरे- वैभववाडी मार्गावरून प्रवास करताना स्वतःची काळजी घ्यावी. सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे यांचे आवाहन.

वैभववाडी

तालुक्यात सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ली खडकदारा रस्त्यावरील ओढ्याचे पाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे त्यामुळे फोंडा – कुर्ली – सडूरे मार्गे वैभववाडी मार्ग बंद आहे. लोरे शिवगंगा नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे आत्ताच फोंडा वैभववाडी मार्ग प्रवासा साठी बंद केला आहे. त्यामुळे फोंडा मार्गे वैभववाडीत येण्यासाठी कुर्ली सडूरे मार्ग प्रवासी शोधत असतील तर त्यांनी फोंडा कुर्ली – सडूरे वैभववाडी मार्गावरून प्रवास करताना स्वतःची काळजी घ्यावी. जास्त पाणी असेल त्या ठिकाणी आपल्या वाहनाने प्रवास करू नये असे आवाहन सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा