You are currently viewing मिनी अंगणवाडी सेविका भरती….

मिनी अंगणवाडी सेविका भरती….

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील अंजिवडे महसुली गावातील अंजिवडे अंगणवाडी केंद्र व गोवेरी महसुली गावातील गोवेरी सर्वेकरवाडी अंगणवाडी केंद्रातील मिनी अंगणवाडी सेविकेची रक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर पदभरतीसाठी त्या महसुलीगावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास योजना, कुडाळ यांच्याकडे सादर करावयाचे आहेत.

            सदर पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा, त्या महसुली गावातील रहिवाशी असावा, वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे, मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच भरतीमध्ये विधवा, अनाथ मुली, मागासवर्गीय उमेदवार, दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सदस्य सचिव तथा बालविकास प्रकल्प अधिकारी, बालविकास सेवा योजना, प्रकल्प कुडाळ, सिंधुदुर्ग हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा